महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या मदतीस कार्यरत असलेले एकमेव माहितीपूर्ण संकेतस्थळ
कृषी विभागाने केला निकृष्ट माल विक्री तक्रार क्रमांक जाहीर, लगेच पहा…

महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाने आज शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासाला लक्षात घेऊन निकृष्ट दर्जाच्या खते, बियाणे, कीटकनाशके जिथून मिळत आहेत त्यांची तक्रार करण्यासाठी तक्रार क्रमांक जाहीर केला आहे. या तक्रार क्रमांकावरून आपल्याला कृषी विभागाला थेट संपर्क करता येणार आहे. कृषी विभागाला संपर्क केल्यास कृषी विभाग तातडीने याची दखल घेऊन आपल्या तक्रारीची नोंद घेणार आहे व संबंधित विक्रेता वर तातडीने कार्यवाही सुनिश्चित करण्यात येणार आहे असे कृषी विभागामार्फत सांगण्यात आले आहे.
कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया
कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना सांगितले की, “या वॉट्सप क्रमांकावर कोणत्याही वितरक, विक्रेता किंवा कोणत्याही कंपनीच्या संदर्भात बियाणे न देणे किंवा बियाणे अधिकच्या भावाने विकणे, इत्यादी प्रकारचे कृत्य जर निदर्शनास येत असतील तर क्रमांकावर शेतकऱ्यांनी तक्रार केल्यास शेतकऱ्यांची माहिती गोपनीय ठेवत सदर तक्रारीची दखल तात्काळ कृषी विभागाद्वारे घेण्यात येईल. आणि जर कोणी असा शेतकऱ्यांचा छळ करत असेल तर कृषी विभाग सदर विक्रेत्यावर कार्यवाही करण्यासाठी सज्ज आहे.”
तक्रार क्रमांक कोणता आहे?
कृषी विभागामार्फत जाहीर करण्यात आलेल्या या 9822446655 तक्रार क्रमांकावर क्लिक करा आणि या संपर्क क्रमांकावर तक्रार नोंदवा असे आवाहन कृषी विभागाद्वारे करण्यात आले आहे. या सम्पर्क क्रमांकावर तक्रार केल्यानंतर पुढील काही वेळातच आपल्याला कार्यवाहीची सुनिश्चितता व परिणाम दिसून येतील असे कळवण्यात आले आहे.
शेतकरी हेल्पलाईन काय सांगते?
शेतकरी हेल्पलाईन सांगते की सदर आवाहनाचे स्वागतच आहे, परंतु त्याला शेतकऱ्यांचा किती प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सदर वॉट्सप क्रमांकावर शेतकऱ्यांनी क्लिक करून तातडीने तक्रार करावी. शेतकऱ्यांनी तक्रारीची माहिती क्रमांकावर देत असताना आपली माहिती देऊ नये जेणेकरून तिची गोपनीयता कायम राहील. आपल्या जिल्ह्याच्या शेतकरी हेल्पलाईनच्या ग्रुपला जुळण्यासाठी स्क्रीनवरील हिरवे बटन दाबा आणि जुळा.