महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या मदतीस कार्यरत असलेले एकमेव माहितीपूर्ण संकेतस्थळ
शिवराज सिंहांनी घेतला असा निर्णय कि थेट शास्त्रज्ञ थेट तुमच्या दारी यायला निघाले, वाचा सविस्तर

२९ मे ते १२ जून या कालावधीत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारतात विकसित कृषी संकल्प अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून ते स्वतः शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत आहेत. पंजाबमधील राजपुरा, पटियाला येथे आयोजित चौपालमध्ये चव्हाण म्हणाले, “चौपालमध्ये बसून थेट संवाद साधल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी समजतात आणि त्यांच्या यशस्वी प्रयोगांचे आदानप्रदान करता येते. हे अभियान म्हणजे फक्त भाषण नव्हे, तर वास्तवाशी जोडलेली कृती आहे.”
या अभियानात देशभरातील १६ हजार वैज्ञानिकांच्या २१७० टीम्स सहभागी असून, त्या ६५,००० गावांमध्ये जाऊन दीड कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहेत. लॅब टू लँड या तत्त्वावर आधारित हे अभियान शेतकऱ्यांना आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञान, व शेतीतील नवे प्रयोग यांची माहिती देणार आहे.
अभियानामध्ये शेतकऱ्यांना पाण्याची बचत, बाजरी व गहू पिकातील समस्या, कमी खर्चात अधिक उत्पादन, उत्पादनाला योग्य भाव, सबसिडी योजना यांची माहिती देण्यात येईल. विज्ञान आणि ड्रोनचा वापर, मत्स्यपालन, डेअरी व पशुपालन यासारख्या पूरक उद्योगांवरही विशेष भर देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने हे मार्गदर्शन देण्यासाठी विशेष प्रशिक्षित टीम बनवलेल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील याबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की, हे फक्त एक सरकारी कार्यक्रम नसून हे जन आंदोलन होण्यासाठी सुरू करण्यात आले आहे. त्यांनी यामध्ये बदलत्या ग्राहकांच्या गरजा, बाजारपेठेची मागणी, वैज्ञानिक शेती, तंत्रज्ञानयुक्त शेती व नफ्याची शेती याला महत्त्व द्यावे असे सुचवले आहे.
शेतकरी हेल्पलाइन काय सांगते?
शेतकरी हेल्पलाइनने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी त्यांच्या गावात आयोजित होणाऱ्या या अभियानात सक्रिय सहभागी व्हावे. वैज्ञानिकांकडून आपल्या शेतीविषयक प्रश्नांची उत्तरे मिळवावीत. यामुळे शाश्वत आणि आधुनिक शेतीसाठी आवश्यक मार्गदर्शन, योजनांची माहिती, आणि उत्पादनवाढीसाठी आवश्यक उपाय समजून घेता येतील.
तुमच्या जिल्ह्यातील तालुक्यातील शेतकरी ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी स्क्रीनवरील बटन दाबा.