महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या मदतीस कार्यरत असलेले एकमेव माहितीपूर्ण संकेतस्थळ 

आता शेताच्या बांधावर लावावे लागतील इतकी झाडे, सरकारचा मोठा निर्णय…

शेतकऱ्यांना पाठवा
शेतकरी व्हाटसप चॅनल लगेच जुळा
2 लाख शेतकरी टेलिग्राम ग्रुप लगेच जुळा
शेतकरी इन्स्टाग्राम पृष्ठ फॉलो करा

वाढते प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढ हा आता अतिशय धोकादायक मुद्दा बनला आहे. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे आणि कार्बन डाय-ऑक्साइड उत्सर्जनामुळे मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. याच प्रदूषणाने आता सरकारला कठोर निर्णय घ्यायला भाग पाडले आहे. आजकाल जे मोठे मोठे पूर येतात त्या पुरात संपूर्ण जमीन वाहून जात आहे. झाडे लावल्याने न फक्त हवा साफ होऊन प्रदूषण कमी होणार आहे तर यामुळे मातीचा स्तर देखील उंचावणारा असून तिची गुणवत्ता वाढणार आहे. शिवाय पाण्याचा संग्रह सुद्धा मोठ्या प्रमाणावर होणार आहे.

आज आपण पाहतो की शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ ओढवताना दिसते आणि ही वेळ सातत्याने बदलणाऱ्या हवामानामुळेच ओढवलेली आहे. जर आपण झाडे लावले नाहीत व त्यांचे प्रमाण वाढविले नाही तर हे हवामान अधिक नुकसानदायी परिवर्तने घेऊन येणार आहे. आगामी काळामध्ये जर ठरल्याप्रमाणे पाऊस नाही झाला तर शेती पिकणे देखील अवघड होणार आहे. पूर्वी वादळे यायची सोबत वारा सुटायचा परंतु हा वारा झाडांना ताडून याची गती कमी देखील तितक्याच व्हायची आणि मोठ्या नुकसानापासून बचाव होत होता.

हवामान अभ्यासक सांगतात की, “ही स्थिती जर लवकरात लवकर ओळखून सुधारण्यात आली नाही तर यापेक्षा देखील वाईट परिस्थितीला शेतकऱ्यांना समोरही जावे लागेल.” त्यामुळे सरकार देखील यावर गांभीर्याने विचार करताना दिसून येत आहे. सरकारचे सूत्र सांगतात कि, “सरकार एक अशा निर्णयाच्या तयारीत आहे जो येत्या 2 महिन्यात होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे झाडांची संख्या तातडीने वाढणार असून हवामान सुधारण्यास फार मोठी भूमिका या निर्णयाची राहणार आहे व प्रदूषण देखील या निर्णयामुळे कमी होताना दिसून येणार आहे.

5treesonfarmbordergovernmentdecision21215560047697559432

काय आहे हा निर्णय?

सरकारच्या काही सूत्रांमार्फत असे कळाले आहे कि, सरकार शेतकऱ्यांना प्रति एकर आपल्या बांधावर लांबीमध्ये किमान 5 झाडे लावण्यास सक्ती करणार आहे. या सोबतच शेताच्या रुंदी मध्ये 3 झाडे सक्ती करणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे बांध एकमेकांना जोडलेले आहेत त्या बांधांवरील झाडे ही दोघांना मिळून लावायची आहेत. ज्या बांधाला दुसरा कोणी शेतकरी नाही मात्र त्या बांधावर एकट्याने ही वृक्ष लागवड करावयाची आहे. शेतावर झाडांची पडणारी सावली आणि त्या सावलीखाली पिकांची खुंटत असलेली वाढ व उत्पादन पाहता सरकार शेतकऱ्यांना बारमाही फळे, फुले इत्यादी अशी उत्पन्नात भर टाकणारी झाडे लावण्यासाठी प्रोत्साहित करणार आहे.

शेतकरी काय म्हणतात?

शेतकऱ्यांचे देखील याबाबतीमध्ये मत सकारात्मक असून शेतकऱ्यांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटविल्या आहेत.
शेतकरी सखाराम पाटील यांचे म्हणणे आहे कि, “वायु प्रदूषण तथा तापमानात होणारी वाढ व वेळापत्रकानुसार न पडणारा पाऊस ऐरणीचा विषय बनला असून सरकारच्या या निर्णयाचे मी स्वागतच करतो. झाडे लावल्याने न फक्त पुरामुळे माझी जमीन वाहण्यापासून वाचणार आहे तर माझ्या जमिनीत पोषक असणाऱ्या तत्त्वांची देखील भर पडणार आहे. काही ठिकाणी मला सावलीचा त्रास होईल परंतु मी बारमाही येणाऱ्या आंब्याची झाडे लावणार असून त्या झाडांमुळे मला फायदाच होणार आहे.”
शेतकरी विश्वनाथ काळसे म्हणतात कि, “मी गेल्या दहा वर्षापासून गट शेतीमध्ये सदस्य असून माझ्यासोबत या गट शेतीमध्ये अजून 48 शेतकरी जोडलेले आहे आणि या निर्णयाचे आम्ही स्वागतच करणार आहोत. माझ्या गटामध्ये असलेले सर्व शेतकरी बांधावर झाडे लावण्यास सकारात्मक आहेत परंतु ही झाडे सरकारने आम्हाला अनुदान तत्त्वावर उपलब्ध करून द्यावी व त्याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करावे अशी आमची सरकारकडे विनंती आहे.”

सरकारच्या निर्णयाप्रमाणे झाडे न लावण्यास काय होणार?

सरकार ह्या निर्णयाकडे अतिशय गांभीर्यपूर्वक बघत असून याची 100% अंमलबजावणी झालीच पाहिजे यासाठी काही कठोर नियम व अटी देखील यामध्ये आणणार आहे. ज्यामध्ये जे शेतकरी झाडे लावणार नाहीत व त्यांचे संगोपन करणार नाहीत त्यांना सरकारच्या योजनांचे लाभ बंद करणे अथवा यापुढे समोर जे लाभ ते घेऊ इच्छितात असे लाभ बंद करण्याचा विचार देखील सरकार करत आहे असे सूत्र सांगतात.

शेतकऱ्यांपुढच्या अडचणी काय आहेत?

झाडे लावल्यानंतर त्या झाडांचे संगोपन व्यवस्थित झाले पाहिजे, त्याला व्यवस्थित वेळोवेळी पाणी मिळाले पाहिजे व तसेच त्याला जोपर्यंत फळे फुले येत नाहीत तोपर्यंत संगोपन करणे हे मोठे आव्हान शेतकऱ्यांपुढे राहणार आहे. विशेषतः जिथे कोरडवाहू जमीन आहे अश्या ठिकाणी त्यांना ही झाडे पावसाळ्यामध्ये लावावी लागणार आहेत किंवा सुक्ष्मसिंचन सुविधेचा अवलंब करावा लागणार आहे.

बांधावर झाडे लावल्यास काय परिणाम दिसून येतील?

एकंदरीत शेतकऱ्यांची याबाबत संमिश्र अशी प्रतिक्रिया दिसून येत आहेत. झाडे लावल्यामुळे त्यांच्या जमिनीची सुपीकता वाढणार आहे. पुरामुळे होणारे धोके तसेच जमिनीतील पाण्याची साठवण क्षमता देखील वाढणार आहे. ज्या जमिनीतील उत्पादन कमी आहे त्या जमिनीचे उत्पादनात सुद्धा भर पडेल. शिवाय महत्त्वाचे मुद्दे म्हणजे प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढ याला आळा घालता येणार आहे. आज आपण पाहतो कि बरेच शेतकरी हे उन्हाळ्यात आपली धुरे पेटवून देतात ज्यामुळे असंख्य पक्षांचे जीवन उध्वस्त होते तसेच मोठी झाडे देखील जळून पडतात हे देखील हा निर्णय झाल्यामुळे थांबणार आहे. परंतु हे सर्व शेतकऱ्यांच्या समर्थनाविना सरकारला शक्य होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा सहभाग आणि प्रतिसाद यामध्ये मोलाची भूमिका बजावणार आहे.

5treesonfarmbordergovernmentdecision31801931083609231641

झाडे लावल्यानंतर सरकार पुढची काय आव्हाने आहेत?

झाडे लावल्यानंतर सरकारला या झाडांची माहिती सरकारकडे संग्रहित करणे आवश्यक राहणार आहे. ही माहिती संग्रहित केल्यास झाडे लावण्याआधी आणि झाडे लावल्यानंतर वातावरणामध्ये होणारे बदल, जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता तपासणे, या निर्णयाचा किती तोटा व किती नफा झाला यावर अभ्यास करणे महत्वाचे ठरणार आहे. किती शेतकऱ्यांनी यामध्ये भाग घेतला अथवा त्यांच्या बांधावर जाऊन याची खात्री करणारी प्रणाली विकसित करणे गरजेचे ठरणार आहे. शेतकऱ्यांनी लावलेल्या झाडांचे व्यवस्थित संगोपन व्हावे यासाठी देखील वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत रहावे याची सुनिश्चितता सरकारला करावी लागणार आहे.

शेतकरी हेल्पलाईन काय सांगते?

शेतकरी हेल्पलाइन सांगते कि, “हा निर्णय शेतकऱ्यांसाठी व पृथ्वीवरील समस्त जनजीवनासाठी झाल्यास शेतकऱ्यांनी याला पूर्णपणे प्रतिसाद देऊन फक्त आपल्यापुरता विचार न करता पृथ्वीवरील संपूर्ण जन जीवनासाठी हा निर्णय पोषक ठरेल अशी भूमिका शेतकऱ्यांनी घ्यावी. शेतकरी हेल्पलाईन नेहमी शेतकऱ्यांच्या हितार्थ बाजू मांडत असून लाखो शेतकऱ्यांनी आम्हाला विश्वासात्मक प्रतिसाद दर्शविला आहे. शेतकरी हेल्पलाईनच्या तुमच्या जिल्ह्याच्या ग्रुपला जुळण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या हिरव्या बटन वर क्लिक करा.”

शेतकरी व्हाटसप चॅनल लगेच जुळा
2 लाख शेतकरी टेलिग्राम ग्रुप लगेच जुळा
शेतकरी इन्स्टाग्राम पृष्ठ फॉलो करा
शेतकऱ्यांना पाठवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *