बाबरावांचा प्रयोग आणि घडला चमत्कार, तुम्ही सुद्धा करा

शेतकऱ्यांना पाठवा
शेतकरी व्हाटसप चॅनल लगेच जुळा
2 लाख शेतकरी टेलिग्राम ग्रुप लगेच जुळा
शेतकरी इन्स्टाग्राम पृष्ठ फॉलो करा

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील शेतकरी बाबाराव देशमुख यांनी आपल्या कोरडवाहू जमिनीवर प्रयोगशील शेतीचा नवा अध्याय लिहिला आहे. बाबाराव हे मुख्यतः सोयाबीन, भुईमूग, तूर, हरभरासारखे पीक घेत असतात आणि यावेळी त्यांनी एक नवीन संकल्पना राबवायला सुरुवात केली पारंपरिक गोवार्कचा वापर करून विक्रमी उत्पादन घेतले आहे. रासायनिक खतांचा अतिरेक आणि महागड्या किटकनाशकांमुळे शेती अलाभकारक ठरत असताना बबनरावांनी पारंपरिक गोपालन व्यवस्थेचा आधार घेत नैसर्गिक पद्धतीने उत्पादन वाढवण्याचा मार्ग निवडला.

babarao experiment farming miracle do it yourself shetkari helpline 28039265716222978709

बाबाराव सांगतात कि एका एकर क्षेत्रासाठी ते वर्षभर जुन्या दोन गोवऱ्या सुमारे १० लिटर पाण्यात सहा ते सात दिवस भिजवून ठेवतात. हे भिजवलेले गोवार्क रोज एकदा ढवळून घेतात ज्यामुळे त्यातील नैसर्गिक घटक एकत्र मिसळतात.

babarao experiment farming miracle do it yourself shetkari helpline 37008967961868518385

सातव्या दिवशी हे मिश्रण गाळून घेतले जाते आणि त्यातील २ लिटर गोवार्काला १५ लिटर क्षमतेच्या फवारणी पंपाच्या टाकीत १३ लिटर पाण्यासोबत मिसळून फवारणीसाठी तयार केले जाते. हे द्रावण मग शेतात पंपाच्या साहाय्याने फवारले जाते

या नैसर्गिक गोवार्कामुळे मातीतील गांडुळांसारख्या सजीव घटकांची वाढ होते, जमिनीतील ओलावा टिकतो आणि पिकांच्या मुळांवर नैसर्गिक संरक्षण तयार होते. यामुळे पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढतेच पण शेतकरी कृषी केंद्रातून जे “मायक्रोन्यूट्रिएंट्स”च्या नावाखाली विकले जाणारे रासायनिक खत आणतात त्यांच्यासारखीच नैसर्गिक पोषणद्रव्येही पिकाला मिळतात ज्यामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ होते. यावेळच्या हंगामात बाबारावांनी या पद्धतीने शेती करताना उत्पादनात सुमारे ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचे स्पष्टपणे अनुभवले. विशेष म्हणजे यासाठी कोणतीही रासायनिक फवारणी किंवा खत वापरण्याची गरज पडली नाही.

babarao experiment farming miracle do it yourself shetkari helpline 42235094780044066965

पूर्वी रासायनिक खतांवर अवलंबून राहिल्यामुळे बाबारावांचा शेतीवरील खर्च वाढत गेला, पण उत्पादन कमी होत गेले. आता मात्र त्यांनी गुरांपासून मिळणाऱ्या साधनांचा वापर करून एक स्वयंपूर्ण आणि टिकाऊ शेती प्रणाली उभी केली आहे. जमिनीलाही श्वास घेण्याची संधी मिळाल्याने तिची सुपीकता सुधारली आहे. याचा थेट परिणाम पिकांच्या रंग, उत्पादन आणि जमिनीच्या आरोग्यावर दिसून येतो.

बाबाराव सांगतात, ‘‘पूर्वी बाहेरून औषधं आणायचो, पैसा खर्च व्हायचा, पण तरीही उत्पन्न समाधानकारक नसायचं. आता गोवार्क वापरल्याने शेतात नैसर्गिकपणे ओलावा टिकुन राहतो आणि पीकही निरोगी राहते. जमिनीच्या कणाकणाला पोषण मिळतं. जमीन ही आपली माय आहे आणि तिचं रक्षण केलं तरच ती आपल्याले भरभरून देते.’’

शेतकरी हेल्पलाइन काय सांगते?
हा प्रयोग आता गावातील इतर शेतकरीही पाहत आहेत आणि तेही गोवार्क पद्धतीची चौकशी करत आहेत. पारंपरिक शेतीतूनच खरी समृद्धी मिळू शकते हे बाबाराव देशमुख यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांमुळेच महाराष्ट्रात निसर्गाशी सुसंगत शेतीचा नवा प्रवाह तयार होत आहे. बाबनरावांचा प्रयोग अजमावून तुम्हीही अशीच फवारणी करून बघा आणि आपले उत्पादन वाढवा. शेतकरी हेल्पलाइनच्या तुमच्या तालुक्यातील समूहात सहभागी होण्यासाठी स्क्रीनवरील बटन दाबा.

शेतकरी व्हाटसप चॅनल लगेच जुळा
2 लाख शेतकरी टेलिग्राम ग्रुप लगेच जुळा
शेतकरी इन्स्टाग्राम पृष्ठ फॉलो करा
शेतकऱ्यांना पाठवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *