खतांचे दर वाढल्याची बातमी ठरली अफवा, शेतकरी विरोधी सरकार दाखवण्याचा होता प्रयत्न

शेतकऱ्यांना पाठवा
शेतकरी व्हाटसप चॅनल लगेच जुळा
2 लाख शेतकरी टेलिग्राम ग्रुप लगेच जुळा
शेतकरी इन्स्टाग्राम पृष्ठ फॉलो करा

मागील 2 ते 3 दिवसांपूर्वी खतांचे दर वाढले अश्या बातमीमुळे एकच खळबळ देशभर तसेच राज्यभर उडाली. त्यातच शेतकऱ्यांना आधीच शेतमाल भाव कमी मिळत असल्याच्या चर्चा असताना अजून एका अफवेने पेट घेतला. ही अफवा म्हणजे शेतकऱ्यांना सरकारद्वारे अनुदान तत्वावर खत उपलब्ध वरून देण्यात आलेल्या खतांचे भाव वाढवण्यात आले आहे. ह्या अफवेला बळ मिळावा म्हणून जागतिक बाजारात दर वाढले आहेत आणि त्यामुळे भारत सरकारने खतांचे भाव वाढवले आहेत हे सुद्धा त्या वृत्तांमध्ये नमूद करण्यात आले.

इतकेच नव्हे तर मुख्य वृत्त वाहिन्यांद्वारे या बातमीची पडताळणी न करता या वृत्ताला प्रसिद्धी दिली. या वृत्तात खालील प्रमाणे 50 किलोच्या गोणीप्रमाणे दरवाढ झाली आहे असे सांगण्यात आले :-

क्रमांक खत सध्याची किंमत वाढलेली किंमत
1 सिंगल सुपर फॉस्फेट 500 रुपये 600 रुपये
2 10:26:26 खत 1470 रुपये 1700 रुपये
3 20:20:0:0 खत 1250 रुपये 1450 रुपये
4 24:24:0:0 खत 1550 रुपये 1700 रुपये

या खोट्या किमती असणाऱ्या यादीच्या प्रसारामुळे वृत्ताची खत उद्योग आणि भारत सरकार तसेच राज्य सरकारचे कृषी विभाग खडबडून जागे झाले. शेतकऱ्यांना व खत विक्रेत्यांना या संभ्रमातून बाहेर काढण्यासाठी कृषी गुणनियंत्रण विभागाचे संचालक विकास पाटील यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली व या बैठकीच्या माध्यमातून दर वाढले नसून ते जशास तसे आहेत हे खरे वृत्त शेतकऱ्यांपर्यंत, वृत्तपत्रे व वाहिन्यांपर्यंत पोहोचविण्यात यावे याचे आदेश देण्यात आले.

fertilizerpricesincreasedfakenewsshetkarihelpline22070675398260243779
खतांचे दर वाढल्याची बातमी ठरली अफवा, शेतकरी विरोधी सरकार दाखवण्याचा होता प्रयत्न 3

खतांच्या कच्च्या मालाच्या किमतीची जेव्हा वाढ होते तेव्हा लगेचच भारतातील कंपन्यांद्वारे आपल्या खतांचे भाव वाढवले जात नाहीत आणि ते वाढवायचे असल्यास त्यांना केंद्राची परवानगी घ्यावी लागते व ती मिळाल्या नंतरच त्यांना भाववाढ करणे शक्य असते. मुळातच भाववाढ न झाल्या मुळे कोणत्याही प्रकारची परवानगी ही केंद्रातून घेण्यात आलेली नाही व ती देण्याचा प्रश्न देखील उदभवला नाही. शिवाय आरसीएफ कंपनीच्या काही खतांची किंमत कमी झाली असल्याची स्पष्टता ही कंपनीचे उपमहाव्यवस्थापक पदावर कार्यरत असलेले भगवानसिंह चौहान यांनी त्यांच्या लेखी पत्रात कळवले आहे.

सध्या राज्यात निवडणुकीचे वातावरण आहे आणि लोकसभेची ही मुख्य निवडणूक अत्यंत महत्वाची असून देशाची धुरा कोणत्या विकासशील हातात दिल्या देण्यात यावी ह्याचा निर्णय जनता करताना दिसून येते. यात मोठा वाटा हा शेतकऱ्यांचा देखील असतो आणि तेच लक्षात घेता सध्याच्या सरकारला कसे शेतकरी विरोधी दाखवता येईल यासाठी काही राजकीय पक्षांच्या दबावाला बळी पडून काही वृत्तपत्रांद्वारे ही बातमी लावण्यात आली. या बातमीला अधिकचा वाव तर तेव्हा मिळाला जेव्हा मुख्य आणि विश्वासपूर्ण मानल्या जाणाऱ्या वृत्तपत्र आणि वाहिन्यांनी याची दखल घेत पडताळणी न करता प्रसिद्धी देण्याचे काम केले.

आता मात्र सरकारच्या कृषी विभागाने स्पष्ट केले आहे कि भाव जसे होते तसे कायम आहेत. कृषी विभागाने आदेश दिले आहेत कि या भावांच्या आधारे कोणी जर शेतकऱ्यांची दिशाभूल करून खत विकत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कठोर कार्यवाही करण्यात यावी व दंड आकारण्यात यावा. शेतकरी हेल्पलाईन म्हणून आमचा प्रयत्न आहे कि आपल्याला योग्य ती माहिती मिळावी. त्यामुळे आम्ही आपल्याला खतांचे सध्या असलेले भाव अवगत करून देत आहोत जे आपण जर कोणी आपणास भाव वाढले आहे असे सांगत असेल किंवा कोणतेही खत विक्रेते अफवेच्या आधारे खतांची किंमत वाढवत असेल तर त्यांना ही बातमी दाखवावी. ग्रामीण भागात ही अफवा दूरवर पसरली आहे तरी एक शेतकरी म्हणून सर्व शेतकऱ्यांना ही बातमी पाठवून त्यांचे निराकरण करावे.

खतांच्या भावांची अधिकृत आकडेवारी खालील प्रमाणे आहे :-

उर्वरक मूल्य

क्रमांक खत किंमत
1 डीएपी 18:46:0:0 1350 रुपये
2 एनपिके 10:26:26:0 1470 रुपये
3 एनपिके 19:19:19 1650 रुपये
4 एनपिके 12:32:16 1470 रुपये
5 एनपिके 16:16:16:0 1375 रुपये
6 एनपिके 17:17:17 1210 रुपये
7 एनपिके 08:21:21 1800 रुपये (40 किलो)
8 एनपिके 09:24:24 1900 रुपये (40 किलो)
9 एनपिके 15:15:15 1470 रुपये
10 एनपिके 14:35:14 1700 रुपये
11 एनपी 24:24:0:0 1500 ते 1700 रुपये
12 एनपी 14:28:0 1700 रुपये
13 एनपी 20:20:0:0 1300 रुपये
14 एनपी 28:28:0:0 1700 रुपये
15 एमओपी 0:0:60:0 1655 – 1700 रुपये
16 एएस 20:4:0:0:23 1000 रुपये
17 एनपीकेएस 15:15:15:09 1450 ते 1470 रुपये
18 एनपीएस 16:20:0:13 1150 – 1470 रुपये
19 एनपीएस 24:24:0:08 1600 रुपये
20 एसएसपी (भुकटी) 0:16:0:12 490 ते 550 रुपये
21 युरिया 266.50 रुपये (45 किलो)
22 एसएसपी (दाणेदार) 0:16:0:11 430 – 590 रुपये

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शासनाच्या शेतकरी योजना आहेत, शेतकरी हेल्पलाईनवर योग्य त्या शेतकरी बातम्या आहेत, शेतकरी मार्गदर्शन व माहिती आहे तसेच शेतकरी बाजार भाव माहिती ही आपल्या हेल्पलाईनवर उपलब्ध आहे. आम्ही आपणास आवाहन करतो कि या सर्वांचा आपण लाभ घ्यावा व इतर काही मदत लागल्यास तुमच्या जिल्ह्याच्या शेतकरी हेल्पलाईनला शेतकरी वॉट्सप ग्रुपच्या माध्यमातून जुळा ज्याचे बटन तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे.

शेतकरी व्हाटसप चॅनल लगेच जुळा
2 लाख शेतकरी टेलिग्राम ग्रुप लगेच जुळा
शेतकरी इन्स्टाग्राम पृष्ठ फॉलो करा
शेतकऱ्यांना पाठवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *