शेतकरी वाचवणार घरचे बियाणे वापरून तब्बल इतक्या कोटींचा खर्च, वाचा कसा?

शेतकऱ्यांना पाठवा
शेतकरी व्हाटसप चॅनल लगेच जुळा
2 लाख शेतकरी टेलिग्राम ग्रुप लगेच जुळा
शेतकरी इन्स्टाग्राम पृष्ठ फॉलो करा

आज आपण पाहतो कि जागतिक बाजाराच्या आवक-जावकांवर शेतमालाचे भाव ठरताना दिसून येतात. अश्यात शेतात लागणाऱ्या बियाण्यांचे भाव मात्र काही फारसे कमी-जास्त होताना आढळून येत नाहीत. गेल्या काही वर्षांपासून हवामानात फार वेगळे बदल दिसून येत आहेत जसे कि पेरणीच्या काळात पाऊस भरघोस पडणे परंतु त्यानंतर अकणकुर फुटल्यानंतर 15 दिवस, 1 महिना किंवा त्याहून अधिक कालावधीने पडणारा पाऊस शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवताना दिसून येते. दुबार पेरणी म्हटले कि पुन्हा एकदा तितकाच खर्च बियाण्यांवर होतो जितका पाहिल्यावेळेस झाला होता आणि त्यामुळेच आता शेती अभ्यासक आणि शास्त्रज्ञसुद्धा शेतकऱ्यांना घरीच बियाणे कसे तयार करावे व पेरणीतील मोठा खर्च कसा टाळता येऊ शकतो यावर मार्गदर्शन करताना दिसून येतात.

गेल्या काही वर्षांपासून एका पिकाची पेरणी आपल्याला महाराष्ट्रातील बहुतांश भागात होताना दिसून येत आहे ते म्हणजे सोयाबीनचे पीक आहे. आता सोयाबीनचे पीक घेणे जितके सोपे आहे तितकेच त्याच्यावर येणाऱ्या रोगराई आणि त्याला पूरक अश्या पाण्याची व्यवस्था शेतकऱ्यांसाठी मोठी दमछाक निर्माण करणारा आहे. यावर्षी तब्बल 65 हजार क्विंटलहुन अधिकच्या बियाण्यांची आवश्यकता भासणार आहे. ह्यावर खर्च देखील मोठ्या प्रमाणात अपेक्षित आहे परंतु 70 % शेतकऱ्यांनी यावेळेस घरी सोयाबीनचे बियाणे तयार करून पेरणी करण्याचा निर्धार केल्याचे दिसून येत आहे. बियाणे तयार करण्यासाठीची औषधे जसे कि मुख्यतः बुरशीनाशके सुद्धा कशी बियाण्यांना घरीच लावून बियाणे खराब होणार नाही याच्यासाठीचे यंत्रे सुद्धा शेतकऱ्यांनी विकत घेतली आहेत. शिवाय गेल्या काही वर्षांपासून जागतिक बाजारपेठेच्या अनुसार ठरत असलेल्या भावांमुळे घरात सोयाबीनचा मोठ्या प्रमाणावर साठा हा शेतकऱ्यांनी घरात राखून ठेवला आहे त्यामुळे तोच पुन्हा वापरात आणावा यावर शेतकरी भर देताना दिसून येत आहेत.

famerswillsavethismuchmoneyonsowingshetkarihelpline2270479304367900159

यावर्षी तब्बल 85 हजार हेक्टरवर सोयाबीन या पिकाची मोठ्या प्रमाणावर पेरणी होणार असून त्याचे पावसापूर्वीचे नियोजन आणि शेतातील पाट, ओढे, नाले, इत्यादी देखील व्यवस्थित करण्याची कामे आता जोर धरताना दिसून येत आहेत. या सगळ्यातच शेतकऱ्यांनी घरीच बियाणे तयार केल्याच्या निश्चयामुळे सुमारे 90 कोटींचा खर्च वाचणार आहे.

बातमी आपल्याला विश्वासार्ह वाटली असेल तर इतर शेतकऱ्यांना नक्की पाठवा. आपल्या शेतकरी हेल्पलाईनच्या तुमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ग्रुपला जुळण्यासाठी स्क्रीनवरील हिरवे बटन नक्की दाबा.

शेतकरी व्हाटसप चॅनल लगेच जुळा
2 लाख शेतकरी टेलिग्राम ग्रुप लगेच जुळा
शेतकरी इन्स्टाग्राम पृष्ठ फॉलो करा
शेतकऱ्यांना पाठवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *