महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या मदतीस कार्यरत असलेले एकमेव माहितीपूर्ण संकेतस्थळ
कांद्यावरील निर्यात बंदी काढण्यात आली, वाचा कोणत्या देशाला विकू शकता कांदा…

नुकत्याच केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार कांद्यावरील निर्यात बंदी ४ मे रोजी काढण्यात आली आहे आणि शेतकऱ्यांद्वारे स्वागत करण्यात येत असून आनंदही व्यक्त करण्यात येत आहे. या निर्णयामुळे कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे.
अनेक दिवसांपासून कांद्यावर लागलेल्या निर्यात बंदीमुळे कांदा पिकवणारे शेतकरी अडचणीत सापडले होते आणि त्यांच्या शेतमालाला योग्य तो भाव मिळत नव्हता परंतु आता निर्यात बंदी काढण्यात आल्यामुळे जगातल्या कोणत्याही देशाला विकता येईल अशी सुविधा उपलब्ध झाली आहे.

या निर्णयामध्ये किमान 550 अमेरिकन डॉलर प्रति मेट्रिक टन असा कांदा निर्यातीला परवानगी मिळाली असून ज्याला तातडीने भारत सरकारच्या विदेश व्यापार मंत्रालयाद्वारे लागू करण्यात आले आहे.
या निर्णयातून असे दिसून येते की सरकार शेतकऱ्यांच्या प्रति अनुकूल असून त्यांच्या पिकांना योग्य तो भाव मिळावा यासाठी निरंतर प्रयत्न करत आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने आणि नवनवीन निर्णयांनी आणि सरकारच्या सकारात्मक पाऊलांमुळे शेती क्षेत्राला मोठी भरारी निर्माण झालेली दिसून येत आहे. सरकारच्या योग्य निर्णयांमुळे व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी घेतलेल्या ह्या निर्णयामुळे सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे.