
महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या मदतीस कार्यरत असलेले एकमेव माहितीपूर्ण संकेतस्थळ

महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या मदतीस कार्यरत असलेले एकमेव माहितीपूर्ण संकेतस्थळ

आजपर्यंत सरकार महाराष्ट्रातील किंवा देशातील दौरे शेतकऱ्यांसाठी आयोजित करत होते. परंतु आता नवतंत्रज्ञानाची गरज शेतकऱ्यांना भासत आहे. शेतीमध्ये मजुरांचा तुटवडा, जमिनीची होत चाललेली दुर्दशा आणि सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी एक चालना देण्याकरिता शेतकऱ्यांना परदेशातील शेतीचा अनुभव करून देण्यात यावा यासाठी फडणवीस सरकारने पुढाकार घेतला आहे. आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाचा अनुभव शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत अभ्यासद्वारे दिला जाणार असून, शेतकऱ्यांना विविध देशांमध्ये नेण्यात येणार आहे आणि तेथील शेतीचा अनुभव त्यांना प्रत्यक्ष दिला जाणार आहे तसेच तज्ज्ञांचे मार्गदर्शन देखील मिळणार आहे.
या नवयुगामध्ये ग्राहकांची मागणी केवळ उत्पादनापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर त्यांना शेतमालाची गुणवत्ता अधिक चांगली आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची अपेक्षित आहे. त्यामुळे केवळ उत्पादन घेणे व उत्पादकता वाढवणे यापुरती शेती मर्यादित न राहता, शेतमालाची गुणवत्ता सुधारण्यासाठीही प्रयत्न करणे आवश्यक झाले आहे. हे शेतकऱ्यांना पटवून देण्यासाठी आणि त्यांना या दृष्टीने प्रोत्साहित करण्यासाठीच शेतकऱ्यांसाठी परदेश दौरे आयोजित करण्यात येत आहेत. या दौऱ्यांमध्ये इस्त्रायल, युरोप, जपान, व्हिएतनाम सारख्या देशांमध्ये शेतकरी जाणार आहेत. कृषी विभागाने सर्व शेतकऱ्यांना तातडीने आपली माहिती आणि आवश्यक कागदपत्रे कृषी विभागाकडे जमा करण्याचे आवाहन केले आहे.
इतर देशांमधील आधुनिक तंत्रज्ञान, काढणीनंतरचे तंत्रज्ञान, दुधाचे उत्पादन, सेंद्रिय शेती आणि प्रगतशील झालेले शेतीपद्धती प्रत्यक्ष पाहण्यासाठी आणि ते तंत्रज्ञान शिकण्यासाठी हे दौरे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. या दौऱ्यांमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनात वाढ करता येणार आहे, मालाची गुणवत्ता सुधारता येणार आहे आणि आधुनिक संसाधनांचा वापर कसा करावा हेही शिकता येणार आहे. राज्यातील शेतकरी जसे अधिकाधिक प्रगत होत चालले आहेत, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकरी देखील अधिक सक्षम आणि जागतिक स्तरावर स्पर्धेस पात्र व्हावा यासाठी फडणवीस सरकार कृषी विभागाच्या संलग्न सहाय्याने हे महत्त्वाचे कार्य पार पाडत आहे.
या योजनेनुसार शेतकऱ्यांना परदेशातील शास्त्रज्ञ, स्थानिक शेतकऱ्यांच्या भेटी, त्या शेतकऱ्यांची शेती प्रति असलेले नियोजन, दृष्टिकोन आणि ज्ञान यांचा थेट लाभ होणार आहे. 2025-26 या वर्षासाठी हे विदेश दौरे आयोजित करण्यात आले आहेत.
इच्छुक शेतकऱ्यांनी आपले अर्ज कृषी विभागाला तातडीने सुपूर्त करावेत. २३ जुलै २०२५ पर्यंत शेतकऱ्यांनी आपले अर्ज सादर करावयाचे आहेत. हे आवाहन सर्व जिल्ह्यांच्या आणि तालुक्यांच्या कृषी अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
अर्ज करताना काही महत्त्वाच्या अटी आणि कागदपत्रांची पूर्तता आवश्यक आहे. सर्वप्रथम, शेतकऱ्यांकडे अग्रेसर कार्ड असणे गरजेचे आहे. शेती शेतकऱ्याच्या नावावर असावी आणि त्या नावावर असलेले सातबारा व आठ अ हे उतारे मागील सहा महिन्यातील असावेत. उत्पन्नाचे मुख्य साधन शेतीच असले पाहिजे. त्याचप्रमाणे, स्वयंघोषणापत्र म्हणजेच प्रपत्र दोन सादर करणे आवश्यक आहे.
शेतकऱ्याकडे परदेशात प्रवास करण्यासाठी आवश्यक असलेले पासपोर्ट हे दस्तऐवज असणे अत्यावश्यक आहे. केवळ पासपोर्ट फोटो असून उपयोग नाही. पासपोर्ट म्हणजे परदेश प्रवासासाठी अधिकृत ओळखपत्र असते. ज्यांच्याकडे पासपोर्ट नाही, त्यांना परदेश दौऱ्यासाठी जाता येणार नाही. अर्जदाराचे वय किमान २५ वर्षे पूर्ण असणे अनिवार्य आहे आणि शेतकरी शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. या संदर्भात एम.बी.बी.एस. वैद्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. या दौऱ्यांसाठी कुटुंबातील इतर सदस्यांना घेऊन जाण्यास परवानगी नाही. याची सर्वांनी दक्षता घ्यावी.
खाजगी, शासकीय, सहकारी किंवा इतर कोणत्याही संस्थांमध्ये कार्यरत असलेले अभियंते, कंत्राटदार, वैद्य, वकील इत्यादी कर्मचाऱ्यांना या दौऱ्यासाठी पात्र मानले जाणार नाही. अर्जासोबत शिधापत्रिका म्हणजेच राशन कार्ड तसेच आधार कार्डची छायाप्रत जोडणे आवश्यक आहे. शिधापत्रिकेतील कुटुंबाची व्याख्या ही केवळ पती-पत्नी आणि १८ वर्षांखालील मुले/मुली यापुरतीच मर्यादित करण्यात आलेली आहे.
या अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांची निवड कशी होईल याबाबतही निकष ठरवण्यात आले आहेत. त्यानुसार, एक महिला शेतकरी, एक केंद्र किंवा राज्यस्तरावरील कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी किंवा पीक स्पर्धा विजेता शेतकरी आणि इतर तीन सामान्य शेतकरी असे पात्रतेच्या निकषांनुसार निवड करण्यात येणार आहे.
या अभ्यास दौऱ्यासाठी खालील देशांमध्ये अभ्यास दौरे आयोजित करण्यात आले आहेत:
दक्षिण कोरिया – आठ दिवसांसाठी दक्षिण कोरियामध्ये प्रक्रिया व अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान शिकण्यासाठी अभ्यास दौरा आयोजित करण्यात आलेला आहे.
स्वित्झर्लंड, हांस, जर्मनी, नेदरलँड (युरोप) – युरोपमधील या देशांमध्ये दुधाचे उत्पादन, फळांचे उत्पादन तसेच सेंद्रिय शेती शिकण्यासाठी बारा दिवसांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आलेला आहे.
जपान – जपानमधील सेंद्रिय शेती तसेच आधुनिक तंत्रज्ञान शिकण्यासाठी दहा दिवसांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आलेला आहे.
व्हिएतनाम, मलेशिया, फिलिपाईन्स – या देशांमध्ये काढणीनंतरचे तंत्रज्ञान आणि त्याचे व्यवस्थापन कशाप्रकारे केले जाते, हे पाहण्यासाठी १२ दिवसांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आलेला आहे.
इस्त्रायल – पाण्याची उत्कृष्ट व्यवस्थापन तसेच कृषीमध्ये करण्यात आलेले यांत्रिकीकरण आणि आधुनिक शेती तंत्रज्ञान यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी नऊ दिवसांचा इस्त्रायल अभ्यास दौरा आयोजित करण्यात आलेला आहे.
चीन – चीनमधील महत्त्वाचा कृषी एक्सपो, विविध कृषी तंत्रज्ञान आणि पिकांची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी चीनने उचललेली पावले दाखवण्यासाठी आठ दिवसांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आलेला आहे.
या अभ्यास दौऱ्यांसाठी शासनाकडून एकूण खर्चाच्या कमाल १ लाख रुपये किंवा खर्चाच्या ५० टक्के इतके शासकीय अनुदान दिले जाणार आहे. उर्वरित खर्च शेतकऱ्यांनी स्वतः करायचा आहे.
अशी संधी शेतकऱ्यांना वारंवार मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली कागदपत्रे कृषी विभागाला सुपूर्त करावीत आणि परदेशात जाण्याची तयारी दर्शवावी. परदेशातील अतिप्रगत तंत्रज्ञान हे आपल्या शेतीसाठी आणि आपल्या परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठी देखील उपयुक्त ठरू शकते. उत्पादन वाढ, गुणवत्ता सुधारणा, तंत्रज्ञान विकसित करणे या सर्व बाबतीत हे दौरे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
वरील नमूद देशांचे तंत्रज्ञान प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार आहे. प्रत्यक्ष तिथे जाऊन तंत्रज्ञान अनुभवणे आणि केवळ आपल्या मोबाईलवर त्याचे व्हिडीओ पाहणे यामध्ये मोठा फरक असतो. तेथील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रश्न विचारून, त्यांच्याकडून अधिक माहिती घेतल्याने आपल्या ज्ञानात आणि दृष्टीकोनात निश्चित वाढ होणार आहे.
दुधाचे उत्पादन, फळांचे उत्पादन, उत्पादन क्षमता वाढवणे, माल साठवणूक अशा अनेक गोष्टी ज्या आजपर्यंत आपण आपल्या देशात पाहिल्या नाहीत किंवा वापरलेल्या नाहीत त्या प्रत्यक्ष अनुभवता येणार आहेत. त्यामुळे शेतकरी हेल्पलाइनचे आवाहन आहे की, शेतकऱ्यांनी तात्काळ आपली कागदपत्रे कृषी विभागाला सुपूर्त करावीत आणि अभ्यास दौऱ्यासाठी सज्ज व्हावे. आपला तालुका समजून घेण्यासाठी स्क्रीनवरील बटन दाबावे.