महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या मदतीस कार्यरत असलेले एकमेव माहितीपूर्ण संकेतस्थळ
आता सातबारा झाला बंद लगेच बनवा हे शेतकरी कार्ड, वाचा आणि फायदा घ्या…

शेतकऱ्यांना डिजिटल क्रांतीकडे नेणारी अत्यंत महत्त्वपूर्ण ॲग्रीस्टॅक योजना आली आहे. ही योजना शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी “युनिक आयडी फॉर फार्मर्स” प्रदान करते. ज्यामुळे त्यांना हमीभाव, पीक कर्ज, पीक विमा, इत्यादी शासकीय सुविधा सुलभपणे प्राप्त होणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांची कामे सुलभ होणार असून सरकारी कार्यालयांमध्ये होणारी त्यांची पायपीट थांबणार आहे ज्यामुळे जलद व अधिक तात्काळ गतीने त्यांची कामे मार्गी लागणार आहेत.
योजनेची अंमलबजावणी आणि सुरुवात
युनिक आयडी फॉर फार्मर्स म्हणजेच आधार कार्डप्रमाणे एक विशिष्ट ओळखपत्र आहे आणि १६ डिसेंबर २०२४ पासून या योजनेची अंबलबजावणी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांची माहितीची जमा करून एकाच ओळखपत्रावर विविध योजनांचा फायदा मिळवण्यासाठी काम सुरू झाले आहे. प्रत्येक जिल्ह्यात शेतकऱ्यांना युनिक आयडी मिळवण्यासाठी विशेष शिबीर आयोजित करणे सुरू झाले आहे. २ ते ३ दिवसांचा ह्या नोंदणी शिबिरांचा कालावधी असणार असून शेतकऱ्यांच्या प्रतिसादाप्रमाणे त्यांचा कालावधी सुनिश्चित करण्यात येत आहे. नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन आणि ऑफलाइन अश्या दोन्ही प्रकारे उपलब्ध असणार आहे.
योजनेचा फायदा कोणत्या मुख्य बाबींना होईल?
शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या योजनेचा लाभ होईल व आधार कार्डप्रमाणे एक विशिष्ट ओळखपत्र मिळणार आहे. ज्यामुळे शेतजमिनीच्या कागदपत्रांची, शासकीय माहितीची, कर्जाच्या कागदपत्रांची आणि हमीभाव इत्यादी सर्व बाबी सुलभ होणार आहेत. केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे ज्यातून शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वार्षिक मिळतात. राज्य सरकारने सुद्धा ‘नमो शेतकरी सन्मान योजना’ सुरू केली आहे आणि यातून शेतकऱ्यांना आणखी सहा हजार रुपये मिळतात असे एकूण १२,००० रुपये वार्षिक मिळतात. परंतु काही शेतकऱ्यांना या लाभांपासून वंचित राहावे लागते त्याचे कारण म्हणजे ई-केवायसी अपूर्ण असणे, कागदपत्रांमध्ये त्रुटी असणे ज्यामुळे त्यांचा लाभ थांबवला जातो. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची गोळा केलेली माहिती त्रुटी आणि अडचणींवर नियंत्रण ठेवण्यास उपयोगी पडणार आहे.
शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी बँकांमध्ये आणि तहसील कार्यालयांत अनेक वेळा पायपीट करावी लागते आणि कर्ज मिळवण्यात अडचणी येतात पण या शेतकरी कार्डामुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळवणे अधिक सोपे होईल आणि अवघ्या काही तासातच कर्ज उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना हमीभाव मिळवण्यासाठी योग्य बाजारपेठेतील मागणी आयडी कार्डाच्या माध्यमातून आणि संकेतस्थळावरून मिळणार आहे. शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकणे सोपे होईल आणि शासकीय योजना तसेच कृषी अनुदानांचा लाभ मिळवता येईल.
नोंदणी प्रक्रिया कश्याप्रकारे आहे?
युनिक आयडी फॉर फार्मर्स नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध आहे ज्याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या आधार कार्ड, जमिनीच्या माहिती, पीकासंबंधी माहिती आणि इतर कागदपत्रे अपलोड करावयाची आहेत. ज्या शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करणे शक्य नाही, त्यांच्यासाठी प्रत्येक गावात विशेष शिबीर आयोजित केले जातील, ज्याद्वारे शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीने आपले agristack card प्राप्त होईल.
योजनेची नोंदणी ऑनलाईन कशी करावी?
वेबसाईट लिंक
सर्वप्रथम Agri Stack Website या लिंकवर क्लिक करा. आपण Agristack च्या महाराष्ट्र राज्याच्या अधिकृत वेबसाईटवर पोहोचाल. वेबसाईटमध्ये उजव्या बाजूस Login हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर Farmer या पर्यायावर क्लिक करा.
नवीन खाते तयार करणे
त्यानंतर नवीन खाते तयार करण्यासाठी खाली Create New User Account हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यावर, ई-केवायसीसाठी आपला आधार क्रमांक प्रविष्ट करा. आधार क्रमांक आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा. मोबाईल क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर Submit बटणावर क्लिक करा. आता आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर एक OTP येईल. हा ओटीपी सहा अंकी किंवा त्यापेक्षा कमी/जास्त असू शकतो. हा ओटीपी प्रविष्ट करा आणि Verify बटणावर क्लिक करा.
पासवर्ड सेट करणे
ओटीपी व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्हाला पासवर्ड सेट करण्याचा पर्याय उपलब्ध होईल. यामध्ये संख्या, अक्षर, आणि विशेष चिन्हांचा वापर करून मजबूत पासवर्ड तयार करा. एकदा पासवर्ड तयार केल्यानंतर खाली Create My Account ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर तुमचे अकाउंट यशस्वीरीत्या तयार होईल.
लॉगिन प्रक्रिया
आता तुम्ही लॉगिन करावे. लॉगिनसाठी तुमचा मोबाईल क्रमांक आणि तयार केलेला पासवर्ड प्रविष्ट करा. त्यानंतर पुन्हा मोबाईल क्रमांकावर आलेला OTP टाकून Login करा.
शेतकऱ्याची माहिती भरणे
आता Register as a Farmer या पर्यायावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर शेतकऱ्यांच्या सर्व माहिती भरण्यास सांगितले जाईल. यामध्ये आधार कार्डावरील पूर्ण नाव, लिंग, वय, जन्मतारीख, पत्ता, आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा. तुमचा पासपोर्ट साईज फोटो किंवा कॅमेऱ्याने काढलेला स्पष्ट फोटो अपलोड करा. व्यवसाय निवडण्यासाठी Farmer किंवा Land Owner यापैकी एक पर्याय निवडा. यानंतर आधार क्रमांक प्रविष्ट करा. जर ईमेल आयडी उपलब्ध असेल तर तो देखील प्रविष्ट करा. ईमेल आयडी देणे अनिवार्य नाही परंतु असल्यास तो नोंदवणे फायदेशीर ठरेल.
जमिनीची माहिती
यानंतर तुमच्या जमिनीची माहिती भरण्यास सांगितले जाईल. यामध्ये जिल्हा, तालुका, Survey Number (गट क्रमांक) आणि क्षेत्रफळ प्रविष्ट करा. त्यासाठी Fetch Land Details या पर्यायावर क्लिक करा. प्रविष्ट केलेल्या माहितीची पुष्टी करण्यासाठी Verify बटणावर क्लिक करा.
ई-स्वाक्षरी प्रक्रिया
तुमच्या माहितीची पुष्टी झाल्यानंतर Proceed to E-Sign या पर्यायावर क्लिक करा. ई-साइनसाठी आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाका. मोबाईल क्रमांकावर आलेला OTP प्रविष्ट करून तो व्हेरिफाय करा. यानंतर ई-साइन प्रक्रिया पूर्ण होईल.
एनरोलमेंट आयडी डाऊनलोड
तुमचा एनरोलमेंट आयडी डाऊनलोड करण्यासाठी बाजूला Download PDF हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा आणि पीडीएफ डाऊनलोड करा. तो पीडीएफ सांभाळून ठेवा, तोपर्यंत तुमचा Farmer ID प्राप्त होत नाही तोपर्यंत याचा उपयोग होईल.
अर्जाची स्थिती तपासणे
तुमचा अर्ज व्यवस्थित सादर झाला आहे की नाही, हे तपासण्यासाठी Check Enrollment Status या पर्यायावर क्लिक करा. जर Pending असा स्टेटस दिसला तर तुमचा अर्ज प्रलंबित आहे. अर्ज मंजूर झाल्यानंतर Approved हा स्टेटस दिसेल.
फार्मर आयडी मंजुरी
जेव्हा स्टेटस Approved दिसेल, तेव्हा तुमचा Farmer ID तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठवला जाईल किंवा तो कृषी सहाय्यकांमार्फत मिळू शकतो. वरील सर्व प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर तुमचा शेतकरी आयडी मिळेल.
योजनेचे भविष्यात होणारे परिणाम
शेतकऱ्यांना मिळणारे हे कार्ड शेतकऱ्यांच्या सर्व संबंधित माहितीचे एकत्रीकरण करेल, ज्यामध्ये पीक कर्ज योजना, अनुदान, विमा इत्यादी सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळेल. यामुळे शेतकऱ्यांना विविध योजना आणि लाभ प्राप्त करण्यास सोपे होईल. त्याच प्रमाणे, सरकारला देखील शेतकऱ्यांसाठी योग्य निर्णय घेणे सोपे होईल. यामुळे सरकारला आगामी काळात शेतकऱ्यांसाठी अधिक प्रभावी आणि उपयुक्त योजना लागू करता येतील.
शेतकरी हेल्पलाईन काय सांगते?
शेतकरी हेल्पलाइन सांगते कि अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर अशी ही योजना आहे. त्यामुळे शक्य तितक्या लवकर आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. जर ऑनलाईन नोंदणी करावयची असल्यास दिलेल्या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी. नोंदणी पूर्ण झाल्यावर हे कार्ड आपल्याला मिळणार आहे. जर ऑफलाइन नोंदणी करायची असल्यास आपल्या गावात किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी आयोजित कॅम्पला भेट देऊन नोंदणी करावी. नोंदणीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची सविस्तर माहिती वर दिलेल्या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये नमूद केलेली आहे आणि हीच कागदपत्रे ऑफलाइन नोंदणीसाठीही आवश्यक आहेत. कार्ड मिळाल्यावर सर्व लाभ मिळवणे अधिक सोपे होणार आहे. त्यामुळे शेतकरी हेल्पलाइन आपणास कार्ड काढण्याचा सल्ला देत आहे. तुमच्या जिल्ह्याच्या शेतकरी ग्रुपमध्ये जुळण्यासाठी स्क्रीनवरील “शेतकरी ग्रुपला जुळा” या बटनावर क्लिक करावे.