महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम २२०: वर्ग-२ भोगवट्यादारांसाठी ऐतिहासिक दिलासामहाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर भोगवटदार वर्ग-२ अशी नोंद असते. स्वातंत्र्यपूर्व काळातील इनाम जमिनी, देवस्थान जमिनी, सिलिंगच्या जमिनी, कुळ कायद्यान्वये मिळालेल्या जमिनी किंवा शासनाने दिलेल्या पट्ट्याच्या जमिनी या वर्ग-२ च्या कक्षेत येतात. अशा जमिनींचे कायदेशीर मालक शेतकरी असूनही, महसूल खात्याच्या अटी व शर्तींमुळे शेतकऱ्याला त्यावर स्वतंत्र अधिकार वापरता येत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.वर्ग-२...