महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या मदतीस कार्यरत असलेले एकमेव माहितीपूर्ण संकेतस्थळ
यावर्षी फक्त इतका आंबा निर्यात होणार, शेतकरी व निर्यातदारांवर युद्धाचे सावट

सध्या जगामध्ये अनेक देशांचे युद्ध सुरू आहे ज्यामध्ये इस्राएल – पॅलेस्टाईनमध्ये मोठ्याप्रमाणावर युद्ध सुरू आहे. ज्यामध्ये दोन्ही देशांच्या संसाधनांचे अतोनात नुकसान होत आहे. अश्यातच अजून काही देशांचे युद्ध चर्चेला आले आहेत ते म्हणजे युक्रेन आणि रुसचे युद्ध आणि हमास व रशियाचे युद्ध ज्यांनी आयात व निर्यातीच्या व्यापाराला मोठा धोका निर्माण केला आहे.
निर्यातदार आणि आयातदार ज्या समुद्रातून त्यांचा व्यापार करत असतात त्या समुद्रांवर या युद्धात सहभागी असलेल्या देशांद्वारे वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे भारताला देखील या आयात-निर्यात व्यापाराचा फटका बसला आहे आणि नुकसान सहन करावे लागत आहे.
आता येऊयात आपल्या आंबा निर्यातीच्या विषयावर तर भारतातून आंबा हे फळ 45 च्या जवळपास व्यापारी मोठ्या स्तरावर निर्यात करतात आणि हा आंबा कोरिया, न्यूजीलँड, अमेरिका, जपान, इ. देशांना निर्यात केला जातो आणि या युद्धजनक परिस्थितीमुळे आंब्याची निर्यात ही खोळंबली जाण्याची दाट शक्यता आहे. एकावेळी 407 पेटी किंवा 1200 किलो इतक्या आंब्याची यशस्वी मागणी झाल्यावर त्याच्या निर्यातीसाठी पाऊले उचलली जातात.

आंबा निर्यात करण्याचे आपले या वर्षाचे लक्ष हे 4 ते 5000 कोटी इतके होते ज्यातील आतापर्यंतची निर्यात ही केवळ 900 टन इतक्या आंब्याची झाली आहे. रत्नागिरी, लासलगाव, इ. ठिकाणच्या आंब्याची निर्यात ही केवळ 400 टनाच्या जवळपास झाली असा आकडा पणन विभाग अधिकाऱ्यांनी दिला जो दर्शवतो कि जून महिन्याच्या अखेर पर्यंत चालणारा हा आंबा निर्यातीचा हंगाम यावेळी 2500 टन आंबा निर्यातीच्या वर जाऊ शकणार नाही.
अपेक्षा आहे आपणास आमच्या ह्या शेतकरी हेल्पलाईनवरील ही बातमी अत्यंत विश्वसनीय स्वरूपात प्राप्त झाली असेल आणि आपले समाधान झाले असावे. अश्या अनेक शेतकरी बातम्या, शेतकरी योजना, शेतकरी मार्गदर्शन व माहिती तसेच आपल्या जिल्ह्याच्या बाजार समितीचे भाव जाणून घेण्यासाठी शेतकरी हेल्पलाईनच्या वॉट्सप ग्रुपला नक्की जुळा.