महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या मदतीस कार्यरत असलेले एकमेव माहितीपूर्ण संकेतस्थळ
हे नाही केले तर बैल होणार शर्यतीतून कायमचा बाहेर, वाचा काय करावे लागणार…

बैलगाडा शर्यतीला आता नुकतीच परवानगी मिळाली असताना हा खेळ पूर्ण महाराष्ट्रभर पुन्हा एकदा सुरू झाला आहे. ह्या खेळावर अनेक रोजगार तसेच बैलांच्या जातींचे संवर्धन आणि शेतकऱ्यांना 4 पैश्यांची मिळकत प्राप्त होते. बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्रात विविध ठिकाणी विविध प्रकारे खेळल्या जातो.
मावळ, शिरूर या भागामध्ये घाट असतो व त्यात बैलांना पळविण्यात येते. विदर्भाकडे सेकंद प्रमाणे ही शर्यत खेळली जाते जसे उदा, एकीकडे रस्त्याच्या आलीकडून व पलीकडून दोन 2 ते 3 फुटांचे खांब रोहण्यात येतात. त्यानंतर शंभर ते दीडशे मीटरचा रस्ता आखून पुन्हा एकदा अशाच प्रकारे खांब रोवले जातात आणि या दोन्ही खांबांच्या मध्ये एक पांढरा दोरा बांधला जातो. जेव्हा बैलांना यामध्ये धावण्याकरिता सज्ज केले जाते तेव्हा अलीकडच्या खांबाचा दोरा तुटताच सेकंद घडी सुरू होते जी एका मांडवात ठेवलेली असते आणि जेव्हा बैल धावून शंभर ते दीडशे मीटर फार करतात आणि समोरील दोन्ही खांबाच्या मदतीने दोरा तोडतात ती सेकंद घडी थांबते आणि तेव्हा आधीच्या खांबाच्या आणि ह्या खांबाच्या मधातील अंतर हे सेकंद मध्ये ग्राह्य धरले जाते. हे दिवसभर सूर्यमावळेपर्यंत चालत राहणारी शर्यत शेतकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण करणारी ठरते. आता उदा. म्हणजे जर एका जोडीने पाच सेकंदामध्ये हे अंतर पार केले तर मग दिवसभरात संध्याकाळपर्यंत पाचच्या आधी दुसऱ्या जोडीला जावे लागेल तरच ती प्रथम क्रमांकावर येऊ शकेल. जर संध्याकाळपर्यंत पाच सेकंदाचे अंतर कोणीही कमी करू शकले नाही तर ज्या जोडीने पाच सेकंदामध्ये ते अंतर पार केले आहे त्या जोडीला विजयी घोषित केले जाते. त्याच प्रमाणे पाच च्या वर जे अंतर असतील त्याप्रमाणे पहिला, दुसरा, तिसरा व इतर क्रमांक ठरवले जातात. काही ठिकाणी शर्यती अशा प्रमाणे होतात की दोन्हीकडून दोन जोड्यांना सज्ज केले जाते व त्यामागून जो माणूस बसतो त्याला “धुरकरी” असे संबोधले जाते. बैलगाडी प्रमाणेच ज्या गाडीला ही दोन्ही जोडी जुंपलेली असते तिला “रेंगी” असे म्हणतात. ह्या रंगीचे वजन अतिशय हलके असते त्यामुळे बैलांना धाव घेण्यास सोपे जाते. आता दोन्ही बाजूने उभ्या केलेल्या या जोड्यांमधून जी ही जोडी सर्वात आधी रस्त्याचे अंतर कापेल ती पहिल्या क्रमांकाची जोडी मानल्या जाते आणि त्याप्रमाणे बक्षिसाचे वितरण सुद्धा होते. काही ठिकाणी तर अशा प्रकारचे बक्षीस असतात की घर, मर्सिडीज गाडी, दुचाकी, 51 हजार रुपये, 1 लक्ष रुपये कुठे तर 50 लाखांपर्यंत सुद्धा बक्षीसे असतात आणि शेतकऱ्यांमध्ये हेच बक्षीस जिंकण्याची होड लागलेली असते.
आता ही बाजू झाली आनंदाची आणि रोमांच्याची परंतु सगळं काही व्यवस्थित चाललंय याप्रमाणे दिसत असताना पेटा या संस्थेने बैलगाडा शर्यतीवर केलेला अभ्यास आणि त्यातून निघालेली काही निरीक्षणे बैलांच्या जीवावर बेतणारी होती आणि त्यामुळेच बैलगाडा शर्यतीवर इतके दिवस बंदी होती. सदर खटला हा सुप्रीम कोर्टामध्ये लढण्यात आला असून महाराष्ट्र सरकार व भारत सरकारने भक्कमपणे शेतकऱ्यांची बाजू मजबूत करत या प्रकारे अशा प्रकारचे कोणतेही गैरप्रकार होणार नाहीत व त्यासाठीच्या नियमावली जारी करण्यात आल्या ही खात्री मिळाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने बंदी उठवण्याचे आदेश दिले पुन्हा एकदा बैलगाडा शर्यत महाराष्ट्र मध्ये सुरू झाली.
बंदी का लागली होती याचे कारण म्हणजे बैलांना दारू पाजणे, बैलांच्या दोन्ही बाजूने कानाच्या काटेदार खिळे वस्तू लावणे, बैलांच्या डोळ्यांमध्ये मिरची पूड टाकणे, बैलांना स्टेरॉइडचे इंजेक्शन देणे, बैलांना खिळे असलेल्या काड्या टोचणे, बैलांना भर उन्हामध्ये कोणत्याही प्रकारचे छायाचित्र न ठेवता उभे करणे, तसेच त्यांना पाण्याची चाऱ्याची व्यवस्था नसणे, बैलांना त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त पळविणे, पाय मोडला किंवा पायाला इजा झाली असताना सुद्धा बैलांची शर्यत लावणे तसेच गाडी मधून उतरत असताना कोणत्याही प्रकारची व्यवस्था न करणे शिवाय लहान वयाच्या बैलांना पळविणे असे प्रकार घडताना आढळून आले आहेत आणि अशा काही कारणांमुळे बैलगाडा शर्यतीवर बंदी लागली होती.
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवताना कोणत्या प्रकारची काळजी घेतली गेली?
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविताना राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेण्याचे आदेश बैलगाडा शर्यत आयोजकांना दिलेले आहेत. बैलगाडा शर्यतीमध्ये बैलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही व खिळेदार काटेदार अशा वस्तूंचा उपयोग होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी पोलिसांना शर्यतीच्या ठिकाणी थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच बैलांना छायाचित्र व चारापाण्याची व्यवस्था उपलब्ध असेल याची सुनिश्चिता करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बैलगाडा शर्यत कार्यक्रम अश्याप्रकारच्या सर्व बाबी पडतालुनच आयोजित करण्यात यावा असे निरीक्षण नोंदविण्यात आले.
आता तुमच्या बैलाला का शर्यतीमध्ये पळता येणार नाही आणि त्याबाबत काय आदेश जारी करण्यात आले ते जाणून घेऊयात…
जिल्हाधिकाऱ्यांनी असे आदेश दिले आहेत की बैलांच्या कानाला टॅग असलेच पाहिजे असे “इयर टॅग” नसल्यास कोणत्याही बैलाला बैलगाडी शर्यतीमध्ये भाग घेता येणार नाही याची दक्षता जिल्हाधिकारी, तहसीलदार घेणार आहेत. बैलांना कानाला टॅग असला तरच बैलांची विक्री सुद्धा आता करता येणार आहे. हा टॅग नसलेल्या बैलांना बाजारपेठेमध्ये सुद्धा विकता येणार नाही सदर आदेशाचे पालन न झाल्यास कठोर दंड किंवा कारावासाची शिक्षा सुद्धा यामध्ये होऊ शकते.
का लावायचा आहे टॅग?
“नॅशनल डिजिटल लाईव्ह स्टॉक मिशन” हे केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने आणलेल्या या प्रणालीमार्फत तुमच्या पशूचे वंध्यत्व उपचार, औषधोपचार, मालकी हक्क हस्तांतरणाची नोंद तसेच पशुच्या जन्म-मृत्यूची नोंद त्यामध्ये असते. हे टॅग सामान्यतः पिवळ्या रंगाचे असते व एका बारकोड प्रमाणे पशुच्या कानावर लावल्या जाते जे 12 अंकांचे असते.
कधीपर्यंत करावे लागणार पशुच्या कानाला इयर टॅग?
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे शेतकऱ्यांना तातडीने हे करावयाचे असून 1 जून आधी पशुच्या कानाला टॅग असणे महत्त्वाचे आहे. जर 1 जून नंतर पशुच्या कानाला टॅग नसले तर सदर बैलाला शर्यतीमध्ये भाग घेता येणार नाही. पशु संवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन हे टॅग घेण्याची प्रक्रिया माहीत करून घ्यावी लागणार आहे.
का आहे ही इअर टॅग लावण्याची सक्ती?
बऱ्याचदा असे पाहण्यात आले आहे की पशु आजारी पडतात परंतु त्यांना याआधी कोणत्या आजार झाले आहेत का व ते केव्हा आणि कधी झाले याची माहिती शेतकऱ्यांकडे आढळून येत नाहीत. ही माहिती तातडीने उपलब्ध व्हावी त्यासाठी हे टॅग पशूंना लावण्यात येत आहेत. इअर टॅग लावल्यानंतर यामध्ये वेळोवेळी त्यांना जे ही आजार पशूंना होतील त्यांची संपूर्ण नोंद या टॅगमध्ये समाविष्ट करण्यात येईल. ज्यामुळे समोर होणारे आजार अतिशय चांगल्या प्रकारे हाताळता येतील. इतकेच नाही तर आपण ज्याही बाजारपेठेमध्ये आपला पशु विकण्यासाठी न्याल त्या बाजारपेठेमध्ये आपल्याला तो विकता येणार नाही. आपल्या बैलाची कितीही जरी किंमत लागली तरी सुद्धा त्याची विक्री होऊ शकणार नाही. त्यासाठी हे 12 अंकी बारकोड असलेले त्याग आपण 1 जून पूर्वी आपल्या बैलांना लावून घ्यावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
केंद्र सरकार व राज्य सरकार हे शेतकऱ्यांसाठी नवनवीन धोरण आणून त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. शेतकऱ्याचे शुभचिंतक म्हणून आम्ही शेतकरी हेल्पलाइन म्हणून आपल्याला सुद्धा विनंती करत आहोत कि ज्या प्रमाणे आपण आपल्या पोटच्या मुलाला सांभाळतो तसेच बैल सुद्धा आपल्याला प्राणप्रिय असलेला आपला सहकारी आहे. आपल्या पशूच्या चांगल्या संगोपनासाठी व तो नेहमी निरोगी रहावा शर्यतीत धावत राहावा अनेकानेक पारितोषिके जिंकावे यासाठी आपण आजच हे टॅग आपल्या बैलाला लावून घ्यावे असे आवाहन देखील आम्ही आपणास करत आहोत. शेतकरी हेल्पलाइन आपल्या पशुच्या स्वास्थ्याची मंगल कामना करत आहे आपल्या जिल्ह्याचा शेतकऱ्यांच्या ग्रुपला आपण अजूनही जुळाला नसाल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या हिरव्या बटनवर क्लिक करून आपल्या जिल्ह्याच्या ग्रुपला जुळावे.